शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात पहिल्यांदाच झाले फुफ्फुस दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:38 IST

उपराजधानीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. शहरात अकरावे अवयवदान करण्यात आले व महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच फुफ्फुस दानदेखील झाले.

ठळक मुद्दे५८ वर्षीय व्यक्तीचे अवयवदान : ४ रुग्णांना मिळाले नवे जीवन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. शहरात अकरावे अवयवदान करण्यात आले व महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच फुफ्फुस दानदेखील झाले. ५८ वर्षीय नत्थुजी वंजारी यांचे अवयवदान झाल्यामुळे चार रुग्णांना नवे आयुष्य मिळाले. फुफ्फुस मुंबईतील रुग्णालयात आणण्यासाठी न्यू-एरा रूग्णालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘ग्रीन-कॉरिडोर’ तयार करण्यात आला होता.नथ्थुजी वंजारी नागपूरमध्ये बीएसएनएलमध्ये कार्यरत होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांना हात दुखणं, उलट्या होणं तसंच अचानक घाम आल्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ‘स्ट्रोक’ आल्याचे निदान केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आलं. त्यानंतर डॉ. संदीप नागमोटे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासंदर्भात समुपदेशन केलं. यासाठी रुग्णाला नागपूरच्या ‘न्यू-इरा’ रूग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णाच्या नातेवाईकांनी पहिल्यांदा हृदय दान करण्याची परवानगी दर्शवली. मात्र काही कारणांमुळे हृदय दान होऊ शकत नव्हतं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचं समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर अवयवदानाला परवानगी मिळाली आणि रुग्णाचं फुफ्फुस, दोन्ही किडनी आणि लिव्हर दान करण्यात आलं आहे. या अवयवदानामुळे नागपूर शहरात पहिल्यांदाच फुफ्फुस दान करण्यात आलं आहे. तर नागपूर विभागातील हे तिसरं फुफ्फुस दान होते, अशी माहिती ‘झेटीसीसी’च्या समन्वयक वीणा वाठोरे यांनी दिली. वंजारी यांचे फुफ्फुस मुंबईतील रुग्णाला दान करण्यात आले. दोन किडन्या नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आला. तर यकृत शहरातीलच एका ५४ वर्षीय रुग्णाला दान करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दान