शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक काम निष्ठेने केल्यास यश

By admin | Updated: November 10, 2014 00:59 IST

ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे,

मधुकर धस : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यवतमाळ तालुक्यातील घाटंजी येथील दिलासा संस्थेचे मधुकर धस यांनी केले.प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मुंडले सभागृहात रविवारी ‘आम्ही बिघडलो...तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात मधुकर धस यांची मुलाखत अविनाश सावजी यांनी घेतली. मधुकर धस म्हणाले, वडिलांनी शेळ्यामेंढ्या पाळून ५ एकर जमीन घेतली. आई मोलमजुरी करायची. मी सुद्धा सुट्यात काम करायचो. चौथीपर्यंतचे शिक्षण मामाकडे घेतले. शेजारच्या जोशी सरांनी आग्रह केल्यामुळे मला शाळेत घातले. वर्गात ढ विद्यार्थी होतो. दहावीला कसाबसा ४२ टक्क्यांवर पास झालो. मित्राचा शर्ट घालून परीक्षेला जावे लागले. झाडाचा डिंक काढून विकायचो. कमी टक्क्यांमुळे पुण्यात आर्टला प्रवेश घेतला. आईसोबत कराडला ऊस तोडण्यासाठी गेलो. ऊस लावण्याचा माझा वेग पाहून मालक इतरांपेक्षा अधिक पैसे द्यायचा. त्यानंतर पोल्ट्री फार्मवर काम करून ९० टक्के अंडे असे प्रमाण वाढविल्याने मालकाने ४०० रुपये महिना दिला. गावातून एका समाजसेविकेने पत्र पाठवून गावात ३०० रुपये महिना कबूल केल्याने गावाकडे परतलो. अनेक मोर्चे काढले. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलींसाठी काम केले. पोलीस केस लागल्या. धारणीत कुपोषणग्रस्तांसाठी मोर्चा काढला. त्यानंतर घाटंजीला परतलो. पैशांसाठी मेधाताई पाटकर यांना पत्र लिहले. त्यांनी १२०० रुपये मानधन सुरू केले. बचतगटाची कामे केली.नागपूरला ३ लाखाचा प्रकल्प मंजूर झाला. आयुष्यभर पाण्यासाठी काम करून २४० योजनांद्वारे ९ हजार एकर शेतीला आणि २६ हजार शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले. सिरपूर पॅटर्न, स्वत:चे डोह मॉडेल राबविल्याने नाबार्डने २०१२ चा नॅशनल अवॉर्ड दिला. सध्या आपल्या संस्थेत १५७ कर्मचारी असून १२ कोटींची उलाढाल होते. घाटंजीत गावाचे उत्पन्न ७ लाख प्रतिवर्षावरून १ कोटी १२ लाखावर गेल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. अविनाश सावजी यांनी हसतखेळत त्यांची मुलाखत घेतली. प्रकट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)