चुंबन दिले नाही म्हणून मारली कपाळावर बुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 12:39 IST2021-08-04T12:38:21+5:302021-08-04T12:39:37+5:30

Nagpur News काही क्षणांपूर्वी युवतीला खूप प्रेम करत असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने दुसऱ्याच क्षणाला तिचा नकार ऐकून मारहाण केली. तिच्या कपाळाचे चुंबन मिळाले नाही म्हणून त्याने तिच्या कपाळावर बुक्की मारली.

Lover hits on the forehead of girl | चुंबन दिले नाही म्हणून मारली कपाळावर बुक्की

चुंबन दिले नाही म्हणून मारली कपाळावर बुक्की

ठळक मुद्देयुवतीने नकार देताच केली मारहाण

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काही क्षणांपूर्वी युवतीला खूप प्रेम करत असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने दुसऱ्याच क्षणाला तिचा नकार ऐकून मारहाण केली. तिच्या कपाळाचे चुंबन मिळाले नाही म्हणून त्याने तिच्या कपाळावर बुक्की मारली. अजब प्रेम की गजब कहानी ठरावी, तसा हा प्रकार सोमवारी रात्री प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

राहुल राऊत असे आरोपीचे नाव आहे. तो प्रतापनगरात राहतो. त्याच्या शेजारी १७ वर्षीय युवती राहते. त्यामुळे तिची त्याच्याशी ओळख आणि बातचपत आहे. कधीतरी ती त्याच्यासोबत जाणे-येणेही करते. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री ८ च्या सुमारास डान्स क्लासवरून ती परतली. तिला आरोपी राहुल आणि त्याचा साथीदार दादू या दोघांनी आपल्या प्लेझरवर बसवले. रस्त्यात राहुलने तिला ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’, म्हटले. तिने त्याला नकार देऊन स्पष्ट शब्दात झिडकारले. त्यामुळे काही क्षणांपूर्वी प्रेमाचा दावा करणारा आरोपी राहुल हिंसक झाला. त्याने तिच्या कपाळावर बुक्की मारली. तिच्याशी लज्जास्पद वर्तनही केले. एवढेच नव्हे तर कुणाला काही सांगितले तर जीवे ठार मारेन अशी धमकीही दिली. युवतीने सरळ पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी विनयभंग करून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Lover hits on the forehead of girl