लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/हिंगणा : अनैतिक संबंधांच्या संशयाच्या किड्यामुळे पत्नीचा जीव गेला. संशयाने ग्रस्त असलेल्या पतीने पत्नीवर फावड्याने वार करत तिची हत्या केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रिंकी किशोर प्रधान (२३, पंचशीलनगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिचा पती किशोर शंकर प्रधान (३१) असे आरोपीचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून किशोर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. अनेकदा वाद विकोपालाही गेले होते. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी रिंकी फोनवर बोलत होती. त्यावरून किशोरला संताप आला. त्याने टोकल्यावर रिंकीही संतापली आणि त्यांच्यात मोठा वाद झाला. किशोरने घरातील फावड्याने रिंकीच्या डोक्यावर वार केले व त्यात ती जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेतील रिंकीला किशोरनेच लता मंगेशकर इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे.
प्रधान कुटुंब मूळचे ओरीसा राज्यातील आहे. कामाच्या शोधात हिंगणा एमआयडीसी परिसरातील ईसासनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होते. पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. आरोपी किशोर हा गॅरेजमध्ये काम करत होता. एक महिन्यापूर्वी पत्नी रिंकी इंस्टाग्रामवरील मित्रासोबत बाहेर गेली होती आणि त्यावरून किशोरने तिच्याशी मोठा वाद घातला होता.
Web Summary : Nagpur: A husband, suspicious of his wife's fidelity and an Instagram friendship, fatally attacked her with a shovel. The couple, originally from Orissa, had a love marriage five years prior. The husband has been arrested.
Web Summary : नागपुर: एक पति ने अपनी पत्नी की वफादारी और एक इंस्टाग्राम दोस्ती पर संदेह करते हुए, उस पर फावड़े से घातक हमला किया। मूल रूप से उड़ीसा के रहने वाले दंपति ने पांच साल पहले प्रेम विवाह किया था। पति को गिरफ्तार कर लिया गया है।