नागपुरात कस्टमर केअरच्या नंबरमुळे ५० हजार रुपये गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:24 IST2020-10-22T00:22:53+5:302020-10-22T00:24:06+5:30
Cyber Crime News, Nagpur कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला ५० हजार रुपये गमवावे लागले. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे परिसरात घडली.

नागपुरात कस्टमर केअरच्या नंबरमुळे ५० हजार रुपये गमावले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला ५० हजार रुपये गमवावे लागले. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे परिसरात घडली. ५० वर्षीय मयूर येवलेने त्यांच्या मित्राला गुगल पे द्वारे १२ हजार रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम मित्राच्या अकाऊंटमध्ये जमा न झााल्याने येवले यांनी इटरनेटवरून गुगल पेच्या कस्टमर केअरच्या नंबरची माहिती घेतली. त्यावर संपर्क करून तक्रार केली. त्यावेळी संबंधित आरोपीने फोनवरच येवले यांच्या खात्याची माहिती मागितली. ती मिळाल्यावर ट्रान्सफर झालेले १२ हजार रुपये परत हाेतील, असे आमिष देत मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरही मागून घेतला. या आधारावर येवले यांच्या खात्यातून ५० हजार रुपये लंपास केले. आपण फसवले गेल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. शांतिनगर पोलीसांनी फसवणूक व आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.