शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST

रेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे.

नागपूर विभागाचे पितळ उघडे : दिल्ली लाईनच्या बाजूला साचला तलावदयानंद पाईकराव - नागपूररेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे. अशुद्ध पाण्याचे ‘रिसायकलिंग’ करून रेल्वेगाड्या धुण्यात येतात, अशी शेखी मिरविणाऱ्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे पितळ उघडे पडले आहे. प्रत्यक्षात दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी रेल्वेस्थानकाच्या डी कॅबिन भागातील दिल्ली लाईनजवळ वाहून जात असल्याने तेथे तलाव साचल्याची स्थिती आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही एकाही अधिकाऱ्याला ही पाण्याची नासाडी थांबविण्याची गरज न वाटल्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सिग्नलच्या ‘रुट रिले इंटरलॉकींग’चे(आरआरआय) काम करण्यात आले.या कामासाठी या भागात पाण्याच्या पाईपमधून एक जोडणी दिल्ली लाईनच्या शेजारी देण्यात आली. २०१२ मध्ये ‘आरआरआय’चे काम पूर्ण झाले. तेंव्हापासून ही पाण्याची जोडणी बंद न केल्यामुळे तशीच सुरू असल्यामुळे या भागात पाण्याचा सारखा अपव्यय सुरू आहे. या भागात अनेक गुराखी आपली गुरे चारण्यासाठी येतात. गुरांना पिण्यासाठी पाणी सुरू करतात आणि ते बंद न करता तसेच निघून जातात. याशिवाय असामाजिक तत्त्वही या भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यात बिनधास्तपणे आंघोळ करतात. परंतू त्यांना अटकाव करण्याची तसदी कुणीच घेतलीनाही. रेल्वेस्थानकावर गार्ड लाईनच्या भागात एक जल पुनर्शुद्धीकरण केंद्र आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूच्या नाल्यातील ५ लाख लिटरअशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी रेल्वेगाड्या धुणे, रेल्वेरुळावरील घाण स्वच्छ करणे यासाठी वापरण्यात येते. एकीकडे ‘रिसायकलिंग’ करून पाणी वाचविण्याची शेखी मध्य रेल्वेचा विभाग मिरवतो आणि दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी करतो. रेल्वेच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून दररोज होणारी हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी होत आहे.