शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नागपुरात ऑड-इव्हन पद्धतीने कापड दुकानदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 10:10 PM

सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ जूनपासून दिशेनुसार ऑड-इव्हन पद्धतीने सुरू आहेत. आता १ जुलैपासूनही याच पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आधीच संकटात असलेले व्यापारी या नियमामुळे पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ जूनपासून दिशेनुसार ऑड-इव्हन पद्धतीने सुरू आहेत. आता १ जुलैपासूनही याच पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आधीच संकटात असलेले व्यापारी या नियमामुळे पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. बाजारपेठा अटी आणि नियमांतर्गत सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खुल्या ठेवाव्यात आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी द होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार मदान यांनी एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.मदान म्हणाले, उन्हाळ्याचा खरा सीझन पूर्णपणे गेला आहे. व्यापाऱ्यांना कमाईपेक्षा खर्चच जास्त आहे. दुकाने ५ वाजेपर्यंत खुली असल्याने ग्राहकांना मनमोकळी खरेदी करता येत नाही. अन्य जिल्हे आणि बाहेरगावचे दुकानदार खरेदीसाठी नागपुरात येतच नाहीत. त्यांच्यासमोर खरेदीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.दुकानदार आताही शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करीत व्यवसाय करीत आहेत. बाजारपेठ दररोज सुरू राहिल्यानंतरही पालन करतील. त्यामुळे दुकानात खरेदीदारांची गर्दी कमी राहील. खरेदीचा काळ आहे, पण ऑड-इव्हन पद्धतीमुळे दुकानदारांचे ठरलेले ग्राहक परत जात आहेत. ते अन्य दुकानातून खरेदी करीत आहेत. त्यामुळे दुकानदारांचा ग्राहक वर्ग त्यांच्यापासून दूर जात असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशा संकटाच्या स्थितीत संपूर्ण व्यापारी शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोरोनावर लस येईपर्यंत दुकानदारांना अशाच पद्धतीने जगावे लागणार आहे. दुकाने दररोज सुरू ठेवून प्रशासनाने व्यावसायिकांना मदत करावी.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर