प्रभु विश्र्वकर्मा जयंती उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयाेजन

By आनंद डेकाटे | Updated: February 16, 2025 16:45 IST2025-02-16T16:44:55+5:302025-02-16T16:45:31+5:30

Nagpur : महाप्रसादाकरीता समाजातील ब-याचश्या समाज बांधवांनी वस्तुच्या तसेच अर्थस्वरूपांत सहकार्य केले

Lord Vishwakarma Jayanti in full swing; various programs organized | प्रभु विश्र्वकर्मा जयंती उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयाेजन

Lord Vishwakarma Jayanti in full swing; various programs organized

नागपूर :  अखिल भारतीय विश्वकर्मामय विकास मंडळ,नागपूर तर्फे सोमवारी भगवान विश्वकर्मा यांना जयंतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.   सकाळी प्रभू श्री विश्र्वकर्मा श्री गणेश तसेच बजरंगबलीच्या मूर्ती च्या अभिषेक व पुजा अर्चना लतीका व  विष्णुपंत मोरेकर तसेच सौ. कविता व भुषण लाटकर यांच्या हस्ते झाली. यानंतर ह.भ.प. देवानंद महाराज प्रधाने आणि सहकारी यांनी  गोपालकाल्याचे किर्तन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यामध्ये  मान्यवरांच्या हस्ते स्व. सोमेश राजेंद्र खिरपूरकर यांचे स्मृती प्रित्यर्थ ह.भ.प.बालकष्ण तुलसीराम अटाळकर व ह.भ.प. प्रमाेद श्रीपतराव वेरूळकर या मान्यवरांना वारकरी रत्न पुरस्कार विजयराव खिरपूरकर यांचे सौजन्याने देण्यात आला. काल्याचे प्रसाद वितरण दत्तुजी बाळापूरे यांचे वतीने करण्यात आले. दूपारी स्व.भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था व NSH क्रिटिकल केयर हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर हर्षल मलमकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सिंधुखोंडेकर तसेच कार्यकारिणी च्या सदस्या लताता वझेकर यांच्या नेतृत्वात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये कवियत्री राधा खानझोडे यांनी प्रभू श्री विश्र्वकर्मा यांचे स्तोस्त्र व कविताची सुंदर प्रस्तुती केली,  फेसकानच्या जेष्ठ नागरिक मंडळ, महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती सुनंदा  हरणे यांनी जेष्ठ नागरिक मंडळाच्या कामाविषयी तसेच समाजातील महिलांचे महत्व याबाबत तसेच विश्वकर्मा सुतार महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा नंदा विरुळकर यांनी प्रभू विश्र्वकर्मा या आपल्या दैवतांची विशेष माहिती  दिली. यानंतर आयाेजित गुणवंत सत्कार साेहळयाला आमदार मोहन  मते,संताेषराव बलदेव नाईक, माणिकराव आसटकर, पांडुरंग सातनूरकर, पांडुरंग राऊत, महादेव सावरकर, मधुकर आटनेरकर,मंडळाचे अध्यक्ष विष्णूपंत मोरेकर, अशोक  पातुरकर,पांडुरंग येलकर आदी उपस्थित हाेते. विविध परिक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सुत्रसंचालन समाजाचे युवा कार्यकर्ता  हर्षल मलमकर यांनी केले तर प्रस्तावना मंडळाचे प्रभारी सचिव मधुकर खंडाळकर यांनी मा़डली व आभार प्रदर्शन खिरपूरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाऊराव पुसदकर, विष्णुजी लोणकर, सुर्यभान वझेकर, अशोकराव बाळापूरे, रघुनाथ येलकर, सुखदेव कोळमकर,गजानन येवुतकर, सावरकर (चक्कीवाले) सचिन येनकर, दिनेश वरणकर, शरद मलमकर ,मोहन तांदूळकर, लोकेश भिसेकर,शुभम राऊत तसेच  अशोकराव खेडकर, बबनरावजी पांढुरकर,व अरविंदराव पातुरकर  यांचे विशेष सहकार्य लाभले व युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.  कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली तसेच महाप्रसादाकरीता समाजातील ब-याचश्या समाज बांधवांनी वस्तुच्या तसेच अर्थस्वरूपांत सहकार्य केले.

Web Title: Lord Vishwakarma Jayanti in full swing; various programs organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर