शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया सीबीआय अधिकाऱ्याची लुटमार

By admin | Updated: February 3, 2015 01:04 IST

सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स

निवृत्त मुख्याध्यापकाला लुटले : मनीषनगरातील घटना नागपूर : सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स फ्रेशसमोर आज सकाळी ९.४५ वा. ही घटना घडली. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले निवृत्त मुख्याध्यापक शालिग्रामजी कडू (वय ८०) सध्या मनीषनगरात राहतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते फिरायला निघाले. घराकडे परत जाताना रिलायन्स फ्र्रेशसमोर मोटरसायकलवरील दोन तरुणांनी त्यांना रोखले. या भागात संजय नावाचा लुटारू हैदोस घालत असल्यामुळे आम्हाला खास सीपींनी इकडे पाठविले. आम्ही सीबीआयची माणसं आहोत, असे सांगून त्या लुटारूंनी कडू यांच्याशी सलगी साधली. लुटमार सुरू आहे, असा धाक दाखवून तुमच्याजवळचे दागिने रुमालात बांधून ठेवा, असा सल्लाही दिला. त्यावरून कडू यांनी गोफ आणि सोन्याची अंगठी रुमालात ठेवली. कडू यांच्या बोटातील दुसरी एक सोन्याची अंगठी घट्ट बसल्यामुळे बोटातून निघत नव्हती. ते पाहून एक लुटारू ती जबरीने काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कडू यांना संशय आला. त्यांनी लुटारूंना दूर केले. ओळखपत्र मागताच पलायन तुम्ही जबरदस्ती करू नका, ओळखपत्र दाखवा, असे कडू यांनी म्हटले. त्याच क्षणी लुटारूंनी कडू यांच्या हातातील रुमालात ठेवलेला गोफ आणि अंगठी हिसकावून पळ काढला. कडू यांनी आरडाओरड करून बाजूच्यांचे लक्ष वेधले. त्यांना ही घटना सांगितली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रशांत कडू प्रियदर्शनीला प्राध्यापक आहेत. त्यांनाही फोनवरून ही माहिती कळविली. प्रा. कडू यांनी सोनेगाव पोलिसांना कळविले. पीएसआय निशा बनसोड यांनी कलम ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलीस चौकीची मागणीवृद्धाला दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात लुटल्यामुळे परिसरात रोष निर्माण झाला आहे. या भागात चेनस्नॅचिंग आणि हाणामारीच्या नेहमीच घटना घडतात. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. अनेक दिवसांपासून नागरिक त्या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. मात्र, वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.