पोलीस ठाण्यासमोर लुटमार

By Admin | Updated: June 28, 2015 02:50 IST2015-06-28T02:50:56+5:302015-06-28T02:50:56+5:30

मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणाची अंगठी आणि घड्याळ चक्क पोलीस ठाण्याजवळच हिसकावून घेतली.

Looter in front of police station | पोलीस ठाण्यासमोर लुटमार

पोलीस ठाण्यासमोर लुटमार

नागपूर : मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणाची अंगठी आणि घड्याळ चक्क पोलीस ठाण्याजवळच हिसकावून घेतली. सीताबर्डीत शुक्रवारी रात्री ११ ते ११.३० या कालावधीत ही घटना घडली. देवेंद्र सुरेश नागोतराव (वय २०, रा. रतन अपार्टमेंट, आग्याराम देवी चौकाजवळ) शुक्रवारी तलाव, हा शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास जयस्तंभ चौकाजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलत होता. १८ ते २३ वयोगटातील तीन आरोपींनी पल्सर मोटरसायकल (एमएच ४९ /वाय १६९९) वर येऊन देवेंद्रचा मोबाईल हिसकावून पळ काढला. देवेंद्रने आरडाओरड करीत आरोपींचा पाठलाग सुरू केला. काही नागरिकही मदतीला धावले. सीताबर्डी ठाण्याजवळून हाकेच्या अंतरावर (मॉरिस टी पॉर्इंट, गोवारी शहीद उड्डाणपुलाजवळ) आरोपींची पल्सर बंद पडली. आरोपीने देवेंद्रच्या हातातील अंगठी आणि घड्याळ हिसकावून पळ काढला. (प्रतिनिधी)

Web Title: Looter in front of police station