पेट्रोल पंपावरची रोकड लुटली
By Admin | Updated: August 4, 2015 03:18 IST2015-08-04T03:18:07+5:302015-08-04T03:18:07+5:30
सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत करून चार लुटारूंनी पेट्रोल पंपावरील एक लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी पहाटे २.३० ते

पेट्रोल पंपावरची रोकड लुटली
नागपूर : सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत करून चार लुटारूंनी पेट्रोल पंपावरील एक लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी पहाटे २.३० ते २.४५ च्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बेसा-बेलतरोडी रोडवर इंडियन आॅईलचा पेट्रोल पंप आहे. अंकुश मेहंदी रत्ता यांच्याकडे पंपाचे संचालन आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभराची पेट्रोल विक्री केल्यानंतर बँक बंद असल्यामुळे पंप संचालकांनी एक लाखाची रोकड आपल्या कक्षातील ड्रॉवरमध्ये ठेवली. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री येथे गार्ड डयुटीसाठी संजय भाऊराव गजभिये (वय ५०) आले. पेट्रोल पंपाच्या मध्यभागी बसून असताना रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास तेथे चार लुटारू आले. त्यातील एकाने गजभियेंच्या डोक्यावर काठीचे फटके मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर मागच्या भागात ओढत नेऊन त्यांच्याकडून कार्यालयाची चावी घेतली. व्यवस्थापकाच्या कक्षाचे कुलूप उघडून आतमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाखाची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. दरम्यान, जबर मारहाणीमुळे दहशतीत आलेले गजभिये बराच वेळ पडून होते. लुटारू पळून गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पंपाचे संचालक तसेच हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला.(प्रतिनिधी)
ॉ त्यानंतर पहाटे पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला नंतर वरिष्ठांनीही भेट दिली.
टीप मिळाल्याची शंका
आरोपींनी ही लुटमार संबंधित व्यक्तीच्या माहिती(टीप)वरूनच केली असावी, असा दाट संशय आहे. लुटारूंनी घटनास्थळी येण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मोठ्या वाहनाचा उपयोग केला असावा, असाही संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून लुटारुंचा शोध घेतला जात आहे.