तलावात पाेहणे जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:27+5:302021-04-05T04:08:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी/बाजारगाव : नातेवाइकाकडे आलेले चाैघे मित्र परतीच्या प्रवासात बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. यांतील ...

Looking at the lake is life threatening | तलावात पाेहणे जिवावर बेतले

तलावात पाेहणे जिवावर बेतले

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी/बाजारगाव : नातेवाइकाकडे आलेले चाैघे मित्र परतीच्या प्रवासात बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. यांतील दाेघे पाेहण्यासाठी मंदिर परिसरातील तलावात उतरले. यातील एकाचा बुडून मृत्यू झाला; तर एकाला वाचविण्यात इतर दाेघांना यश आले. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

हिमांशू रमेश झरकर (वय २२, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. हिमांशू झरकर, सेवकलाल धनलाल सोनावणे (३०, रा. इंद्रप्रस्थनगर, नागपूर), अखिल रवींद्र मंडपे (२५, रा. एकात्मतानगर नागपूर) व चेतन शेडमाके (२२, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) हे मित्र असून, ते हिंगणा एमआयडीसी परिसरातील पिक्स ट्रान्समिशन नामक कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. सेवकरामचे नातेवाईक शिवा येथे राहत असल्याने चाैघेही माेटारसायकलने शिवा येथे त्याच्या नातेवाइकांकडे आले हाेते.

परतीच्या प्रवासात ते बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यातच हिमांशू व चेतनला मंदिराशेजारी असलेल्या तलावात पाेहण्याचा माेह झाल्याने दाेघेही तलावात उतरले. दाेघांनाही व्यवस्थित पाेहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे सेवकराम व अखिलने दुपट्टा पाण्यात टाकला. ताे दुपट्टा धरून चेतन कसाबसा पाण्याबाहेर आला. मात्र, हिमांशू खाेल पाण्यात गेल्याने बुडाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने हिमांशूचा पाण्यात शाेध घेतला असता, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह गवसला. पाेलिसांनी तो उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

....

आठवडाभरातील दुसरी घटना

बाजारगाव येथील हा तलाव नाईक तलाव नावाने ओळखला जात असून, त्याची निर्मिती भाेसले काळात करण्यात आली आहे. या तलावाची खाेली २० फुटांपेक्षा अधिक आहे. या तलावात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुलिवंदनाच्या दिवशी प्रतीक तेजराव साेनटक्के, रा. बाजारगाव या मुलाचा याच तलावात बुडून मृत्यू झाल्याने ही आठवडाभरातील दुसरी घटना हाेय. यापूर्वी येथे तिघांचा बृडून मृत्यू झाला हाेता. या घटना टाळण्यासाठी येथे याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे असताना, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

Web Title: Looking at the lake is life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.