कोसूरकर बंधूची होती भाईजानवर नजर

By Admin | Updated: June 22, 2014 01:02 IST2014-06-22T01:02:30+5:302014-06-22T01:02:30+5:30

सक्करदऱ्यातील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंटमधील लग्नात कोसूरकर आणि भाईजानसुध्दा आपापल्या मित्रांसह आले होते. त्यांच्यात प्रारंभी वाहने लावण्याच्या ठिकाणीच शाब्दीक चकमक झडली.

Looked at brother in front of Kosankar brother | कोसूरकर बंधूची होती भाईजानवर नजर

कोसूरकर बंधूची होती भाईजानवर नजर

नागपूर : सक्करदऱ्यातील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंटमधील लग्नात कोसूरकर आणि भाईजानसुध्दा आपापल्या मित्रांसह आले होते. त्यांच्यात प्रारंभी वाहने लावण्याच्या ठिकाणीच शाब्दीक चकमक झडली. गोंधळ झाल्याचे पाहून एका ‘भाई‘ने त्यावेळी या सर्वांची समजूत काढली. त्यामुळे तात्पुरता वाद टळला. दरम्यान, कोसूरकर बंधू भाईजान आणि त्याच्या साथीदारांवर नजर ठेवून होते.
रात्री ११.३० च्या सुमारास भाईजान (रशिद खान), अब्दुल, रोहित नारनवरे आणि प्रदीप घोडे हे चौघे फ्रीडम मोटरसायकलने आपल्या घराकडे निघाले. कोसूरकर बंधू, रॉबिन बोरकर, रोशन बोरकर, रवी तसेच दद्दू खोब्रागडे आणि गोल्डी कुटे तसेच त्यांच्या साथीदारांनी रशिद व त्याच्या साथीदारांचा स्कॉर्पिओने (एमएच ३१/ बीसी ७४१) पाठलाग सुरू केला. जवळ येताच दद्दू खोब्रागडेने तलवार हातात घेऊन कारच्या खिडकीतून रशिद व त्याच्या मित्रांना ‘गाडी रोक आज तेरा मर्डर करना है‘ असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला.
आरोपींचे मनसुबे लक्षात आल्याने रशिद व त्याच्या साथीदारांनी रस्त्याच्या कडेने मोटरसायकल घेतली अन् सुसाट वेगाने पुढे निघाले. ते पाहून आरोपी कोसूरकर बंधू वेगात समोर निघून गेले. ते निघून गेल्याचा समज झाल्याने रशिद आणि त्याचे मित्र पुन्हा रस्त्यावरून मोटरसायकल चालवू लागले. हसनबाग परिसरात अचानक कोसूरकर बंधू समोरून (राँग साईड) आले आणि त्यांनी भरधाव स्कॉर्पिओ रशिदच्या मोटरसायकलवर चढवली. परिणामी रशिद आणि अब्दुल चिरडले गेले. तर, प्रदीप आणि रोहित नारनवरे मोटरसायकलसह समोरच्या ट्रकखाली घासत गेले. स्कॉर्पिओचा वेग एवढा जास्त होता की मोटरसायकलला धडक दिल्यानंतर ही स्कॉर्पिओ ट्रकवर आदळली. परिणामी आतमधील कोसूरकर बंधूंसह सात जण जखमी झाले. एकाचा हात निखळला तर, एकाचे डोके फुटले. स्कॉर्पिओ ट्रकवर आदळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूची मंडळी घटनास्थळी धावत आली. काहींनी नंदनवन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस पोहचण्यापूर्वीच आरोपींनी आपल्या साथीदारांना फोन करून दोन वाहने बोलवली आणि घटनास्थळावरून खासगी रुग्णालयात निघून गेले. नंदनवन पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांना भीषण अपघाताचे चित्र दिसले. जखमी प्रदीप आणि रोहित नारनवरेला मेडिकलला नेण्यात आले. आज रात्री त्याताही मृत्यू झाला. पोलीस अपघाताचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्कॉर्पिओची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यात तलवारी, चॉपर आणि इतर घातक शस्त्रे दिसली. ही स्कॉर्पिओ कुणाच्या नावावर आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्यात कुख्यात कोसूरकर आणि त्याचे साथीदार असल्याचे कळाल्यामुळे पोलीस चमकले. त्यांनी वरिष्ठांना कळविताच उपायुक्त चंद्रकिशोर मिणा, गुन्हेशाखेचे एसीपी नीलेश राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले ताफ्यासह रुग्णालयात धडकले. (प्रतिनिधी)

Web Title: Looked at brother in front of Kosankar brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.