पाहावे ते नवलच!
By Admin | Updated: December 5, 2014 00:42 IST2014-12-05T00:42:50+5:302014-12-05T00:42:50+5:30
गुरुवारपासून रेशीमबाग मैदान येथे सुरू झालेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनात वैज्ञानिक प्रगतीचे निरनिराळे प्रयोग शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहेत. निरनिराळी तांत्रिक उपकरणे, शेतीला उपयोगी

पाहावे ते नवलच!
तंत्रज्ञानाचा करिष्मा : कृषी संशोधनाची मांदियाळी
नागपूर : गुरुवारपासून रेशीमबाग मैदान येथे सुरू झालेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनात वैज्ञानिक प्रगतीचे निरनिराळे प्रयोग शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहेत. निरनिराळी तांत्रिक उपकरणे, शेतीला उपयोगी पडतील अशा नवीन पद्धती आणि पिकांच्या नवीन जाती थक्क करायला लावणाऱ्या आहेत. विशेषत: एक किलोहून अधिक वजन असलेली सीताफळे, पेरू अन् संत्र्यासारखी फळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. (प्रतिनिधी)
देशातील सर्वात मोठा पेरू
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील व्हीएनआर नर्सरी प्रा.लि.तर्फे देशातील सर्वात मोठ्या पेरूची लागवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पेरूचे वजन एक किलो किंवा त्याहून अधिक असते. यात बियांचे प्रमाण कमी असून कमी पाण्यात चांगली फळे तयार होतात, असा येथील संशोधकांचा दावा आहे. पेरूची ही जात विकसित करण्यासाठी छत्तीसगडमध्ये गेल्या १६ वर्षांपासून संशोधन सुरू होते.