१२५ गावांतील दलित वस्त्यांचा लूक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 02:43 IST2016-08-14T02:43:27+5:302016-08-14T02:43:27+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील

The look of dalits in 125 villages will change | १२५ गावांतील दलित वस्त्यांचा लूक बदलणार

१२५ गावांतील दलित वस्त्यांचा लूक बदलणार

आंबेडकर जयंती वर्षानिमित्त विशेष योजना
आनंद डेकाटे नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या गावांचा सर्वांगीण विकास हा येत्या दोन वर्षात करण्यात यईल, हे विशेष.
या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणी, वीजपुरवठा, विद्युत पथदिवे, सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती, समाज मंदिर बांधणे, जुने समाज मंदिर असल्यास दुुरुस्ती करणे, समाज मंदिरात वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह) व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायाम शाळा (सर्व साहित्यासह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे उभारण्यात येणार आहे.


 

Web Title: The look of dalits in 125 villages will change