‘नजर हटी, दुर्घटना घटी’! भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

By योगेश पांडे | Updated: May 17, 2023 16:32 IST2023-05-17T16:31:18+5:302023-05-17T16:32:29+5:30

Nagpur News भावाच्या लग्नात बॅगकडे दुर्लक्ष झाले आणि अज्ञात चोरट्यांनी ८ लाखांहून अधिक रकमेचे दागिने असलेली बॅग लंपास केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

'Look away, the accident will happen'! Sister's jewelery worth 8 lakhs missing in brother's wedding | ‘नजर हटी, दुर्घटना घटी’! भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

‘नजर हटी, दुर्घटना घटी’! भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

योगेश पांडे 
नागपूर : ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या ओळींचा प्रत्यय नागपुरातील दोन बहिणींना आला. भावाच्या लग्नात बॅगकडे दुर्लक्ष झाले आणि अज्ञात चोरट्यांनी ८ लाखांहून अधिक रकमेचे दागिने असलेली बॅग लंपास केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पुजा धनंजय शाहू (२५, भवानीनगर) यांच्या भावाचे १६ मे रोजी लग्न होते. राज रॉयल लॉन, न्यू येरखेडा येथे लग्नसमारंभ असल्याने त्या दागिने घालून आल्या होत्या. त्यांची बहीण दीपा शाहू यादेखील लग्नात होत्या. त्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वत:चे व बहिणीचे सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड, पर्स व रोख रक्कम एका गुलाबी रंगाच्या बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर त्या नातेवाईकांशी बोलण्यात व्यस्त झाल्या व त्या कालावधीत बॅगकडे दुर्लक्ष झाले. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने बॅग लांबविली. त्यात सुमारे ८.३७ लाखांचा मुद्देमाल होता. रात्री दीड वाजता बॅग न दिसल्याने पुजा यांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र बॅग कुठेही आढळली नाही. अखेर त्यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 'Look away, the accident will happen'! Sister's jewelery worth 8 lakhs missing in brother's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.