नागपुरात लोकमत सखी मंचची शानदार ‘व्हिल पॉवर राईड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:22 IST2019-03-09T13:18:30+5:302019-03-09T13:22:06+5:30

जागतिक महिलादिनानिमित्त शनिवारी लोकमत सखी मंचने आयोजित केलेल्या व्हिल राईडचा आनंद उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सखींनी मनमुराद लुटला.

Lokmat's 'Wheel Power Ride'; women Enjoyed a lot | नागपुरात लोकमत सखी मंचची शानदार ‘व्हिल पॉवर राईड’

नागपुरात लोकमत सखी मंचची शानदार ‘व्हिल पॉवर राईड’

ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांनी दाखविली हिरवी झेंडीफेटे, नथ आणि गॉगलचा माहौलनऊवारी लुगडं नेसून बाईक चालवण्याची धडाडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जागतिक महिलादिनानिमित्त शनिवारी लोकमत सखी मंचने आयोजित केलेल्या व्हिल राईडचा आनंद उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सखींनी मनमुराद लुटला. विष्णू जी की रसोई येथून सकाळी १० च्या सुमारास महापौर नंदा जिचकार यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. डोळ््याला काळा गॉगल, नाकात नथ, भरजरी नऊवारी लुगडं आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य ल्यायलेल्या सख्यांच्या उत्साह पाहण्यासारखा होता. या रॅलीत ५०० हून अधिक सख्यांनी सहभागी होऊन महिला दिन साजरा केला. सकाळी निघालेली ही रॅली, लोकमत चौक, लॉ कॉलेज चौक, शंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी अशी फिरून पुन्हा आरंभ ठिकाणी पोहचली. रॅलीत नगरसेविका प्रगती पाटील, अतुल कोटेचा, रिचा जैन, अपर्णा मनोहर, सौ.रोकडे आदी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Lokmat's 'Wheel Power Ride'; women Enjoyed a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.