शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

लोकमत मदतीचा हात : मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:33 IST

मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी वडिलांनी दिवस-रात्र एक केले. ड्रायव्हर म्हणून राबराब राबले. मुलानेही तेवढ्याच मेहनतीने सिव्हिलमधून ‘बीई’चे शिक्षण पूर्ण केले. आता लवकरच नोकरी लागेल आणि घराचा आधार बनेल या अपेक्षेत असतानाच नियतीचे चक्र फिरले. गेल्या आठवड्यात मुलाचा अपघात झाला. पोट आणि कंबरेच्या हाडाचा चुरा झाला. दोन शस्त्रक्रियांमध्येच वडिलांचे पैसे संपले. डॉक्टरांनी आणखी दोन शस्त्रक्रिया सांगितल्या, परंतु त्यासाठी लागणारे चार लाख रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे. दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी हवी आर्थिक मदत : डॉक्टरांनी सांगितला चार लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी वडिलांनी दिवस-रात्र एक केले. ड्रायव्हर म्हणून राबराब राबले. मुलानेही तेवढ्याच मेहनतीने सिव्हिलमधून ‘बीई’चे शिक्षण पूर्ण केले. आता लवकरच नोकरी लागेल आणि घराचा आधार बनेल या अपेक्षेत असतानाच नियतीचे चक्र फिरले. गेल्या आठवड्यात मुलाचा अपघात झाला. पोट आणि कंबरेच्या हाडाचा चुरा झाला. दोन शस्त्रक्रियांमध्येच वडिलांचे पैसे संपले. डॉक्टरांनी आणखी दोन शस्त्रक्रिया सांगितल्या, परंतु त्यासाठी लागणारे चार लाख रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे. दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.सौरभ विनायक मुदाफळे (२२) रा. सर्वश्रीनगर उमरेड रोड दिघोरी. त्या मुलाचे नाव.सौरभचे वडील विनायक ड्रायव्हर आहेत. सध्या ओला कॅब चालवितात. विनायक यांना दोन मुले. मोठा मुलगा सौरभ. आपण चांगले शिक्षण घ्यावे म्हणून वडील करीत असलेली धडपड तो पाहत होता. म्हणून त्याने लवकर नोकरी मिळेल या आशेने सिव्हिलमध्ये ‘बीई’ अभ्यासक्रमाची निवड केली. गेल्याच वर्षी त्याने ‘बीई’ पूर्ण केले. आता नोकरी लागेल या अपेक्षेने घरात आनंदाचे वातावरण होते. काही महिन्यांपूर्वी विनायक यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओप्लास्टी केली. काही दिवस वडिलांचे काम बंद होते. वडिलाच्या उपचारात मोठा पैसा खर्च झाल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली. सौरभने नोकरी मिळेपर्यंत फोटोग्राफीला व्यवसाय म्हणून निवडले. २१ फेब्रुवारी रोजी तो फोटोग्राफीच्या ऑर्डरवर जात असताना खामला चौकात दुचाकी घसरली. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने सौरभला जोरदार धडक दिली. लोकांनी त्याला तातडीने समोरच्याच मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोन शस्त्रक्रिया केल्या. परंतु आणखी दोन मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. चार लाख रुपये खर्चाचे इस्टिमेट दिले. तेव्हापासून वडील पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु एवढा पैसा उभा करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास मुलावर उचपार होतील ही एकमेव आशा त्यांना आहे.हवे मदतीचे बळया कुटुंबाला समाजाच्या आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. विनायक मुदाफळे यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक, शाखा ताजबाग उमरेड रोड, खाता क्रमांक ३०८८३३७३३८२ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. याचा आयएफएससी कोड क्र. एसबीआयएन००१६०९७ आहे. मुदफाळे यांना ८७६६४३९२५६ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय