इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटैरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटैरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते. त्यांनी वार्ताहार म्हणून १९७८ मध्ये छत्तरपूर येथून पत्रकारितेला सुरुवात केली. राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी आपली सेवा दिली. रिवा, इंदोरसह अन्य ठिकाणीही त्यांनी पत्रकारितेत भरभरून योगदान दिले. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी संशोधनात्मक पुस्तके लिहिली. सीमेवरील लढाईसुद्धा त्यांनी कव्हर केली. उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांना प्रतिष्ठित माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता पुरस्कार, राजेंद्र माथुर फेलोशिप, मेदिनी पुरस्कार, डॉ. शंकरदयाल शर्मा सन्मानसह अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते बऱ्याच काळापासून लोकमत समूहाशी जुळलेले होते. एक सजग व निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. व्यापक जनसंपर्क व उत्तम व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. त्यांच्या निधनावर पत्रकारिता, राजकीय व समाजसेवेशी जुळलेल्या लोकांनी शोकसंवेदना व्यक्त केली.
- हिंदी पत्रकारितेतील निष्पक्ष पत्रकार आज आम्ही हरविला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रातील हानी भरून निघणार नाही.
- शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
- शिव अनुराग पटैरिया यांची लेखणी कधी झुकली नाही, कधी थांबली नाही आणि वाकलीही नाही. ते एक परखड पत्रकार होते. त्यांची कमतरता आम्हाला नेहमीच भासेल.
- विजय दर्डा, माजी खासदार व चेअरमन, लोकमत एडिटोरीयल बोर्ड
- वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटैरिया यांच्या निधनामुळे मी दु:खी झालो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. एक सामान्य व्यक्तिमत्त्व पण सर्वांनाच सोबत घेऊन चालणारे ते होते.
- कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
- माझा भाऊ शिव अनुराग पटैरिया नाही राहिला. श्रद्धांजली....
- उमा भारती, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश