शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:49 IST

प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे.

ठळक मुद्देमहिला उमेदवारांबाबत पक्षांची उदासीनताचमहिलांची टक्केवारी अवघी ६ टक्के

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६७ वर्षांत नागपुरात केवळ १९ महिला उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरल्या. यातही अनसूयाबाई काळे वगळता एकाही महिला उमेदवाराला लोकसभेत पोहोचण्यात यश आले नाही.१९५२ ते २०१४ या कालावधीत नागपूर मतदारसंघात एकूण १६ निवडणुका झाल्या व यात ३०२ उमेदवार उभे राहिले. मात्र यापैकी महिला उमेदवारांची संख्या ही केवळ १९ म्हणजे अगदी ६.२९ टक्के इतकीच होती. १९५२ व १९५७ साली लढण्यात आलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत काँग्रेसने अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. त्या सलग दोनदा नागपूर मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतर पुढील चार निवडणुकांत नागपुरातून एकही महिला निवडणुकीत उभी झाली नाही. त्यानंतर १९८० व १९८४ साली प्रत्येकी एक अपक्ष, १९८९ साली चार अपक्ष महिलांनी भाग्य आजमाविले. १९९६ साली काँग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. २९.८३ मतांसह त्या दुसऱ्या स्थानी होत्या.१९९८, २००४ साली परत प्रत्येकी एका अपक्ष महिला निवडणुकीच्या रिंगणात होती. २००९ साली बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांनी अर्ज भरला. याशिवाय प्रतिभा खापर्डे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. मात्र या दोघींनाही अनुक्रमे ०.१३ व ०.१२ टक्के मतेच प्राप्त झाली.२०१४ सालच्या निवडणूकीत ‘आप’च्या अंजली दमानिया यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती. मात्र ही हवा मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. त्यांना ६.३९ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. याशिवाय इतर तीन अपक्ष महिलांनादेखील फारच कमी मतं मिळाली.काँग्रेसने दिली महिलांना तीनदा उमेदवारी४१६ निवडणुकांत कॉंग्रेस सोडून इतर प्रस्थापित पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडताच घेतल्याचे चित्र दिसून आले. कॉंग्रेसने १९५२,१९५७ व १९९६ साली महिलांना उमेदवारी दिली. ‘आप’ने २०१४ साली महिलेला उमेदवारी दिली. तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे २००९ साली एक महिला उमेदवार उभी झाली. उर्वरित १४ महिलांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली. केवळ एक अपवाद वगळता एकाही अपक्ष महिला उमेदवाराला १ टक्क्यांहून अधिक मते मिळविता आली नाही. नोंदणीकृत पक्षांनी महिलांना दिलेल्या उमेदवारीची एकूण उमेदवारांच्या तुलनेतील टक्केवारी ही अवघी १.६६ टक्के ठरली. १९९१ व २०१४ साली सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक