शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

Lok Sabha Election 2019; आमदार अन् इच्छुकांची लोकसभा ‘सेमिफायनल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:49 AM

लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे.

ठळक मुद्देरिझल्टवर बरेच काही अवलंबूनप्रत्येकाचा कस लागणार

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. आता तीच आघाडी आपल्या मतदारसंघात कायम राखण्यासाठी आमदारांची परीक्षा होणार आहे. तर काँग्रेसमधील इच्छुकांचाही चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे यावरून दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या परफॉर्मन्सचे एकप्रकारे आॅडिट होणार असून येणाºया ‘रिजल्ट’वर बरेच काही अवलंबून असणार आहे.नागपुरात भाजपाचे सहा आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपुरातून निवडून गेले आहेत. पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे, पश्चिममध्ये सुधाकरराव देशमुख, मध्य नागपुरात विकास कुंभारे, उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने तर दक्षिणमध्ये आ. सुधाकरराव कोहळे नेतृत्व करतात. कोहळे यांच्याकडे तर पक्षाच्या शहर अध्यक्षपदाचाही भार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी विजयी झाले होते.त्यावेळी दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूर या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपाला १ लाखावर मते मिळाली होती. मुस्लिमबहुल असलेल्या मध्य नागपुरात भाजपाला ९४ हजार १६२ तर रिपब्लिकन विचारांची गठ्ठा मते असलेल्या उत्तर नागपुरातही ७४ हजार ७४६ मते मिळाली होती. पश्चिम नागपुरातही ९३ हजार २५६ मतांपर्यंत भाजपाने झेप घेतली होती. मताधिक्याचा विचार करता सर्वाधिक ६५ हजार ७४२ मतांची आघाडी पूर्व नागपुरात मिळाली होती. तर त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ६२ हजार ७२३ मतांनी काँग्रेस पिछाडीवर होती. उत्तर नागपुरातही १८ हजार ५४० मतांची मुसंडी मारण्यात भाजपाला यश आले होते. अशीच आघाडी कायम ठेवण्याचे सर्वच आमदारांवर ‘प्रेशर’ आहे.लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने सहाही मतदारसंघात झेंडा रोवला. मात्र, लोकसभेच्या तुलनेत काही मतदारसंघात मताधिक्य कमी झाले. भाजपाचे आमदार आपला गड राखण्यासाठी जसे कसून प्रयत्न करीत आहेत तशाच पद्धतीने काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासमोर नागपूर शहरासह पश्चिम नागपुरात काँग्रेसचा सूर्य अस्ताला जाण्यापासूनन वाचविण्याचे आव्हान आहे. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे हे तिन्ही नेते पूर्व नागपुरात मोर्चा सांभाळून आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये प्रफुल्ल गुडधे यांचा कस लागेल. उत्तर नागपुरात मिळणारी मते नितीन राऊत यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करू शकतात. तर सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्यानंतर दक्षिणच्या गादीसाठी इच्छुक असलेले डॉ. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, प्रशांत धवड यांच्या परफॉर्मन्सचेही संयुक्त आॅडिट होणार आहे. मध्य नागपुरात इच्छुकांची संख्या १५ वर आहे. त्यामुळे अनिस अहमद यांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. लोकसभा आटोपली की तिच्या निकालावर चर्चा करता करता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपते. त्यामुळे लोकसभेत मतांची दरी कमी जास्त झाली तर ती विधानसभेत भरून काढण्यासाठी उमेदवारांकडे फारसा वेळ नसणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक आमदार अन् इच्छुकाला लोकसभेची निवडणूक हीच सेमिफायनल समजून काम करावे लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक