शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Lok Sabha Election 2019; राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:17 IST

राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण यांचा इशाराभाजपचा पंतप्रधान होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.दक्षिण नागपुरातील तिरंगा चौक येथे रविवारी रात्री काँग्रेसची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार कुमार केतकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार गेव्हा आवारी, पीरिपाचे नेते जयदीप कवाडे, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी हे त्यांनी पाच वर्षात काय केले ते सांगत नाहीत. मुद्यांवर किंवा जाहीरनाम्यावर बोलत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांवर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करीत आहे. नोटबंदी हा अविचारी निर्णय होता. तो देशातील सर्वात मोठा ‘मनिलाँड्रीगचा फ्रॉड’ असल्याचे भाजपचेच नेते अरुण शौरी यांनी सांगितले आहे. जीएसटी चांगला निर्णय होता परंतु तो किचकट करून ठेवला. २३ मे नंतर नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदावर दिसणार नाहीत. भाजपचा कुठलाच नेता पंतप्रधान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. प्रा. वसंत पुरके यांनीही भाजप सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, या जगात डिजिटल करप्शन कुणी केले असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एक व्यक्ती बिनडोक निर्णय घेते. विज्ञान आणि मोदी यांचा काहीही संबंध नाही. राजीव गांधी यांचा जन्म झाला नसता तर नरेंद्र मोदी यांना कुत्र्यानेही हुंगले नसते, असे आक्षेपार्ह वक्तव्यही त्यांनी केले.

मोदींच्या उधळपट्टींमुळे अर्थव्यवस्था डबघाईस : केतकरनरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात रिझर्व्ह बँकेशी सातत्याने खोटा व्यवहार केला. त्यांच्यामुळे रघुराम राजन यांना जावे लागले. ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. पाच वर्षात मोदींनी बेफाम उधळपट्टी केली. स्वत:च्या जाहिरातीवर सर्वाधिक उधळपट्टी केली. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कर्ज घेतल्याशिवाय या देशाचा व्यवहारच चालू शकणार नाही, अशी परिस्थिती असल्याची टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019