शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

लॉकडाऊनचा महावितरणला फटका : ३१६ वरून १२९ कोटीवर घसरला वीज बिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 19:36 IST

बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे व बिल वाटणे ...

बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे व बिल वाटणे बंद आहे. त्याचा थेट परिणाम वसुलीवर पडला आहे. बहुतांश ग्राहक वीज बिल भरण्यास उदासीनता दाखवत आहेत. त्यामुळे वीज बिलाचा भरणा ३१६.५० कोटीवरून १२९.३५ कोटी रुपयावर घसरला आहे.कोरोना संक्रमण होऊ नये याकरिता बिलिंग प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. बिल संकलन केंद्रेही बंद करण्यात आली आहेत. ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून सरासरी बिले पाठविली जात आहेत. योग्य बिलाची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटवर रीडिंग पाठविण्याचा पर्याय देण्यात आला आहे. नागपूर परिमंडळात २७ हजार ७२० नागरिकांनी या सुविधेचा उपयोग केला. परंतु, बहुतांश ग्राहक वीज बिलाची वाट पाहात आहेत. त्यामुळे महावितरणचे उत्पन्न वेगात घटले आहे. जानेवारी ते एप्रिलमधील आकडेवारी पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते. जानेवारीमध्ये ग्राहकांनी ३१६.५० कोटी रुपयाचे बिल भरले होते. त्यात औद्योगिक ग्राहकांचा वाटा १६१.५५ कोटी तर, घरगुती ग्राहकांचा वाटा १५४.९५ कोटी रुपये होता. एप्रिलमध्ये केवळ १२९.३५ कोटी रुपयाचे बिल जमा करण्यात आले. घरगुती ग्राहकांनी केवळ २९.९५ कोटी रुपयेच जमा केले तर, औद्योगिक ग्राहकांनी ९९.४ कोटी रुपये भरले. एप्रिलमध्ये उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे वीज वापर कमी झाला. परिणामी, बहुतांश औद्योगिक ग्राहकांनी बिल जमा केले.असा घटला वीज बिल भरणामहिने         एलटी ग्राहक          एचटी ग्राहक        एकूणजानेवारी    १५४.९५                १६१.५५               ३१६.५०फेब्रुवारी      १४३.७९                १५८.६०              ३०२.५०मार्च          ११५.७९                 १६३.९६               २७९.५४एप्रिल       २९.९५                   ९९.४                  १२९.३५नोट : रक्कम कोटीमध्येप्रोत्साहन अभियान सुरूलॉकडाऊनमुळे वीज बिल भरणा कमी झाला आहे. सध्या रीडिंग घेणे व बिल वाटणे बंद आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर व्यवस्था पूर्वीसारखी होईल. बिल थकविणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. ग्राहकांनी मीटर रीडिंग ऑनलाईन पद्धतीने पाठवावे तसेच वीज बिल नियमित भरावे. त्यामुळे लॉकडाऊननंतर त्यांच्यावर आर्थिक ताण येणार नाही. ग्राहकांनी आॅनलाईन रीडिंग पाठवावे व बिल नियमित भरावे, याकरिता प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे.-दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल