भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:06+5:302021-01-16T04:11:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल आधी दुभाजकावर धडकली व नंतर घसरली. त्यात खाली ...

The load collided with a two-wheeler divider | भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल आधी दुभाजकावर धडकली व नंतर घसरली. त्यात खाली काेसळल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चालक जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-काेंढाळी-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चाकडाेह परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली.

योगीता किसन रासेगावकर (वय २४, रा. शिवा, ता. नागपूर ग्रामीण) असे मृत महिलेचे, तर भरत ईश्वर ठाकरे (२२, रा. शेकापूर, ता. काटोल) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. दाेघेही एमएच-४०/एएफ-०४४० क्रमांकाच्या माेटरसायकलने काेंढाळीहून नागपूरच्या दिशेने वेगात जात हाेते. भरत माेटरसायकल चालवित हाेता, तर याेगीता मागे बसली हाेती. दरम्यान, चाकडाेह शिवारात भरतचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि माेटरसायकल दुभाजकावर आढळून घसरली. त्यात याेगीताच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भरत जखमी झाला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून याेगीताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला, तर भरतला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याेगीता विवाहित असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार विश्वास फुल्लरवार करीत आहेत.

Web Title: The load collided with a two-wheeler divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.