एलकेपी सिक्युरिटी लि. चा घोटाळा उघड
By Admin | Updated: November 17, 2014 01:05 IST2014-11-17T01:05:43+5:302014-11-17T01:05:43+5:30
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका वित्तीय कंपनीची भर पडली आहे. एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड, धंतोली असे या कंपनीचे नाव असून,

एलकेपी सिक्युरिटी लि. चा घोटाळा उघड
४० लाखांचा गंडा : रानडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एका वित्तीय कंपनीची भर पडली आहे. एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड, धंतोली असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीच्या संचालक दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
मिलिंद रानडे आणि त्याची पत्नी नीता रानडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी धंतोलीतील अमरज्योती पॅलेसच्या दुसऱ्या माळ्यावर एलकेपी सिक्युरिटी लिमिटेड कंपनीचे कार्यालय थाटले होते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मिलिंद आणि नीता रानडे नागरिकांना त्यांच्याकडील रक्कम गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. वर्धा मार्गावरील हिंदुस्तान कॉलनीत राहाणारे चंद्रशेखर विनायक देशपांडे यांची रानडे दाम्पत्यासोबत ओळख होती. अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविल्यामुळे देशपांडे यांनी रानडेच्या कंपनीत ४० लाख रुपये गुंतवले. ५ सप्टेंबर २००८ ते११ डिसेंबर २०१३ पर्यंत रानडे - देशपांडे यांच्यातील व्यवहार चांगला होता. नंतर मात्र आपली रक्कम परत मागण्यास गेलेल्या देशपांडे यांना रानडे दाम्पत्याने टाळणे सुरू केले. वारंवार चकरा मारूनही रानडे दाम्पत्य रक्कम परत करत नव्हते. ते असंबंध्द उत्तरे देत असल्यामुळे रानडे दाम्पत्याने फसवणूक केल्याचे देशपांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे देशपांडे यांनी धंतोली ठाण्यात धाव घेतली. (प्रतिनिधी)
पोलिसांनीही केली होती बोळवण
देशपांडे यांनी रक्कम गुंतविल्याची कागदपत्रे तसेच फसवणूकीचे पुरावे देऊनही प्रारंभी पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे देशपांडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अखेर धंतोली पोलिसांनी शनिवारी मिलिंद आणि त्याची पत्नी नीता रानडे या दोघांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान, रानडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.