लिव्ह इनची परिणती बलात्काराच्या गुन्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST2021-09-27T04:08:41+5:302021-09-27T04:08:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर तीन महिन्यांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ...

Live-in results in rape | लिव्ह इनची परिणती बलात्काराच्या गुन्ह्यात

लिव्ह इनची परिणती बलात्काराच्या गुन्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर तीन महिन्यांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आता प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावताच प्रियकराने तिला सोडून पळ काढला. शारीक अनवर शेख पठाण (वय २१), असे आरोपीचे नाव आहे. तो राळेगाव (जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहे.

तक्रार करणारी युवती (वय १९) वाठोड्यात राहते. दोन वर्षांपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबत ती यवतमाळला एका लग्नात गेली होती. तेथे तिची शारीकसोबत ओळख झाली. त्यावेळी या दोघांनी मोबाइल नंबर एक्स्चेंज केले. त्यानंतर हे दोघे सलग संपर्कात राहू लागले. त्यांचे एप्रिल २०१९ मध्ये प्रेमसंबंध बहरले. तेव्हापासून ते मर्यादा सोडू लागले. गेल्या तीन महिन्यांपूर्वी शारीक नागपुरात आला आणि स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागला. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यामुळे त्यांच्यात रोजच शरीरसंबंध येऊ लागले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युवतीने प्रियकरामागे लग्नासाठी लकडा लावला. काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी तो येथून पळून गेला. त्याने आपला मोबाइलही बंद करून ठेवला. त्यामुळे हवालदिल झालेल्या प्रेयसीने वाठोडा ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार स्नेहलता खापरे यांनी तिची तक्रार नोंदवून घेत आरोपी शारीकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---

Web Title: Live-in results in rape