शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:09 PM

रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोपीस अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील महिला आरक्षक उषा तिग्गा, विकास शर्मा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत संयुक्तरीत्या धाड टाकली. यात रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दुपारी १२.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या एस ८ कोचमध्ये एक व्यक्ती बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला आरपीएफच्या ठाण्यात आणून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याने आपले नाव कुणाल भिकुलाल व्यास (३१) रा. न्यू वाघेश्वरी लॉज, अनाज लाईन, वर्धा सांगितले. बॅगबाबत चौकशी केली असता त्याने त्यात १२९० रुपये किमतीच्या दारूच्या पाच बॉटल असल्याची कबुली दिली. दुसऱ्या घटनेत सकाळी १० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २०१४ रुपये किमतीच्या २५ बॉटल आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी जप्त केलेली दारू आणि आरोपीस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी