महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्लीत गौरव
By आनंद डेकाटे | Updated: March 6, 2024 16:30 IST2024-03-06T16:29:36+5:302024-03-06T16:30:13+5:30
वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला.

महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्लीत गौरव
नागपूर : वीज वितरण क्षेत्रात लाईनवूमन म्हणून पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या हंसा कुर्वे यांचा गौरव करण्यात आला. महावितरणच्यानागपूर परिमंडलांतर्गत लष्करीबाग उपविभागाअंतर्गत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ आणि लष्करीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांचाही केंद्रीय विद्युत प्राधिकरण आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील इंडीया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित लाईनमन दिवस या कार्यक्रमात सन्मान केला.
लाईनवूमेन म्हणून आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या हंसा कुर्वे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांच्यासह महावितरणच्या कोल्हापूर शहर विभागातील प्रधान तंत्रज्ञ प्रकाश पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील क्रंतीचौक शाखा कार्यालतील वरिष्ठ तंत्रज्ञ महेशकुमार वडचकर आणि कोकणातील किसान नगर शाखा ३ कार्यालया अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत श्रावणी शेलार यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.
भारतात वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला.