शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बसचालकाने घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:57 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अ‍ॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अ‍ॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीला कट : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अ‍ॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अ‍ॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.अमरनगर (हिंगणा रोड) येथील रहिवासी रुषीलाल सुखराम उपरीकर (वय ३५) हे त्यांच्या एका मित्रासोबत अ‍ॅक्टिव्हा क्रमांक एमएच ४० / एएस ८६४९ ने चिंचभुवन पुलाजवळून जात होते. एमएच ४०/ एक्यू ६३९८ च्या एसटी बसचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात उपरीकरच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे ते आणि त्यांचा मित्र खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी उपरीकर यांना मृत घोषित केले. वर्दळीच्या मार्गावर झालेल्या या अपघातामुळे तेथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. सचितसिंग सुरजसिंग (वय ३८, रा. बकानेर, ता. रोहता, जि. रोहता) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बसचालक प्रदीप सुदाम मसराम (वय ४६, रा. चिकनी डोमणा, ता. नेर, जि. यवतमाळ) याला अटक केली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू