शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:39 PM

जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा निर्धार

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.इंदोरा बुद्ध विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, मनपा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, अ‍ॅड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, अशोक कोल्हटकर, अ‍ॅड. अजय निकोसे उपस्थित होते.भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना शाल, स्मृतिचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भंते नागघोष यांनी बुद्धवंदना घेतली. प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर धमगाये यांनी केले.इंदोरा बुद्ध विहार येथे भदंत ससाई यांना मान्यवर व नागरिकंकडून शुभेच्छा देण्याचे सत्र दिवसभर सुरू होते.कुणाचाही द्वेष करू नकातत्पूर्वी ‘आज जगाला शांतता, प्रेम, करुणा आणि मैत्रीची खऱ्या अर्थाने गरज आहे, तेव्हा कुणाचाही द्वेष करू नका’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे. आपले जीवन सुकर घडवायचे असेल तर त्यांचे विचार आत्मसात करा, असा धम्मसंदेश भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर