बिबट्याने केली कालवडीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:27 IST2020-12-04T04:27:30+5:302020-12-04T04:27:30+5:30

सावनेर : बिबट्याने शेतातील गाेठ्यात बांधलेल्या गुरांपैकी कालवडीवर हल्ला चढवीत तिची शिकार केली. ही घटना आजनी (ता. सावनेर) शिवारात ...

Leopards hunt calves | बिबट्याने केली कालवडीची शिकार

बिबट्याने केली कालवडीची शिकार

सावनेर : बिबट्याने शेतातील गाेठ्यात बांधलेल्या गुरांपैकी कालवडीवर हल्ला चढवीत तिची शिकार केली. ही घटना आजनी (ता. सावनेर) शिवारात गुरुवारी सायंकाळी घडली.

महेंद्र चावारे यांच्या शेतात गाेठा असून, आत गुरे बांधली हाेती. त्यांना शेतात बिबट आढळून आल्याने त्यांनी आरडाओरड केली. बिबट पळून गेल्यानंतर त्याने गाेठ्यातील कालवडीची शिकार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Leopards hunt calves