त्या बिबट्याला जंगलात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:58 IST2018-04-16T22:58:06+5:302018-04-16T22:58:25+5:30
हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सोडले.

त्या बिबट्याला जंगलात सोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सोडले.
हा बिबट रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पराग बायस्कर यांच्या ‘बाथरूम’मध्ये शिरला होता. ‘रेस्क्यू’ पथकाने त्याला सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्यानंतर त्याला रात्रभर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स, नागपूर येथील ‘ट्रॉन्झिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये ठेवण्यात आले. तिथे त्याच्यावर डॉ. गौतम भोजने व डॉ. व्ही. एम. धुत यांनी औषधोपचार करून रात्री ९ वाजता खायला देण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत. त्यानंतर सोमवारी दुपारी त्याला हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती हिंगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांनी दिली.