शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिरला बिबट्या ! पारडीच्या हनुमाननगरात शिरल्याने खळबळ; सुदैवाने कोणावरही नाही केला हल्ला

By दयानंद पाईकराव | Updated: November 19, 2025 16:43 IST

Nagpur : वन विभागाने केले रेस्क्यु : सुदैवाने कोणावरही केला नाही हल्ला, घटनास्थळी बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडीच्या हनुमाननगरात एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट शिरल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती पारडी पोलिस व वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाने दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास बिबट्यास ट्रॅक्युलाईज करून पिंजऱ्यातून ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरला नेले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पारडीच्या हनुमाननगरात अनिल राऊत हे आपली पत्नी, मुलगा आलोक, अनिकेत आणि मुलगी अंजली तसेच आई, भाऊ, वहिनी व त्यांच्या दोन मुलांसह एका दुमजली इमारतीत राहतात. सकाळी ९ वाजता अनिल राऊत यांचा दहावीत शिकत असलेला १५ वर्षांचा मुलगा आलोक आंघोळ केल्यानंतर दुसऱ्या माळ्यावर बांधकाम सुरु असलेल्या खोलीत कपडे आणण्यासाठी गेला. तेथे त्याने दार उघडताच त्याला एक लांब शेपूट दिसली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने खाली येऊन वडिलांना माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तातडीने पारडी पोलिस व वन विभागाला याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ४.३० तास प्रयत्न करून ट्रॅंक्युलाईज करून बिबट्याला पकडून पिंजऱ्यात टाकले. त्यानंतर या बिबट्याला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Enters Nagpur, Creates Panic; Captured Safely in Pardi.

Web Summary : A leopard entered a building in Nagpur's Pardi area, causing panic among residents. Forest officials tranquilized and captured the animal after a four-hour rescue operation, relocating it to a treatment center. No injuries were reported.
टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागnagpurनागपूर