शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जमाफीचा शासनाच्याच गळ्याला फास

By admin | Updated: February 16, 2015 02:08 IST

शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी थेट सावकाराचेच कर्ज माफ करण्याची विद्यमान सरकारने केलेली घोषणा अंमलबजावणीच्या मुद्यावरून त्यांच्याच गळ्याचा फास ठरू लागली आहे.

नागपूर : शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी थेट सावकाराचेच कर्ज माफ करण्याची विद्यमान सरकारने केलेली घोषणा अंमलबजावणीच्या मुद्यावरून त्यांच्याच गळ्याचा फास ठरू लागली आहे. घोषणेनंतर तब्बल दीड महिना झाला तरी अद्याप आदेश निघू शकले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे त्यांच्यावर असलेले सावकाराचे कर्ज हे प्रमुख कारण असल्याने सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनात सावकारांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर टीकाही झाली. अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होते. घोषणेची अंमलबजावणी करताना मात्र अनेक अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य अडचण ही कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ठरविणे ही आहे. कर्ज देताना सावकार कर्जदाराच्या व्यवसायाची नोंद करीत नाही. फक्त नावाची नोंद करतो. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कर्जदाराच्या यादीतून शेतकरी कोणते हे शोधणे अवघड आहे. यासंदर्भात शेतकरी व सावकारांकडून माहिती मागविण्याचा पर्याय पुढे आला होता. या माहितीची पडताळणी सहकार खात्याने करून शेतकऱ्यांची संख्या निश्चित करायची होती. पण सावकारांच्या असहकार्यामुळे ही पर्यायही फोल ठरला. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या निश्चित होत नाही तोपर्यंत सावकारांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करणे अवघड असल्याचे अधिकारी सांगतात. दरम्यान यातून मार्ग काढण्यासाठी आतापर्यंत मंत्रालयात दोन बैठका झाल्या. पण तोडगा निघाला नाही. मागील आठवड्यात पुन्हा बैठक झाली. एकदा आदेश जारी करा नंतर अंमलबजावणी करताना कुणाचे कर्ज माफ करायचे याबाबत विचार केला जाईल, असे ठरले. त्यामुळे आता आदेशाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)