वैधमापनशास्त्र विभाग : आर्थिक वर्षांत ७० लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:28 PM2019-04-27T21:28:43+5:302019-04-27T21:31:26+5:30

वैधमापनशास्त्र विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास ७० लाख रुपयांचा दंड (प्रशमन शुल्क) वसूल केला असून, फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ६.६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Legal Metrology Department: Recovery of fine of 70 lakh in financial year | वैधमापनशास्त्र विभाग : आर्थिक वर्षांत ७० लाखांचा दंड वसूल

वैधमापनशास्त्र विभाग : आर्थिक वर्षांत ७० लाखांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देफेरपडताळणी व मुद्रांकन शुल्क ६.६१ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैधमापनशास्त्र विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास ७० लाख रुपयांचा दंड (प्रशमन शुल्क) वसूल केला असून, फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ६.६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
नागपूर व वर्धा जिल्ह्यात विक्रेत्यांविरुद्ध १०८५ खटले
वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक हरिदास बोकडे यांनी सांगितले की, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र यंत्रणेला फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ४ कोटी ९३ लाख ८ हजार ६९३ रुपये महसूल प्राप्त झाला. याशिवाय वजन व मापासंदर्भात एकूण ६८० आणि आवेष्टित वस्तूसंदर्भात एकूण ४०५ खटले नोंदविले. या खटल्यांमध्ये प्रामुख्याने छापील किमतीपेक्षा जास्त आकारणी केलेली एकूण २१ प्रकरणे, हार्डवेअर व इलेक्ट्रिकल आस्थापनेविरुद्ध एकूण ११०, मिठाई व ड्रायफ्रूट विक्रेत्यांविरुद्ध ३६, दारू विक्रेत्यांविरुद्ध ७, गॅस विक्रेत्यांविरुद्ध ४, रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांविरुद्ध ३४ तसेच आठवडी बाजारात भाजीपाला व फळे विक्रेत्यांविरुद्ध एकूण ३६० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण ५० लाख ८३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विक्रेत्यांविरुद्ध ४६१ खटले
बोकडे म्हणाले, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात १ कोटी ६७ लाख ७४ हजार ८५६ रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय वजने व मापेसंदर्भात २९६ आणि आवेष्टित वस्तूसंदर्भात १६५ असे एकूण ४६१ खटले नोंदविले. यामध्ये छापील किमतीपेक्षा जास्त आकारणी केलेली एकूण ७ प्रकरणे, हार्डवेअर अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल आस्थापनेविरुद्ध २६, मिठाई व ड्रायफ्रूट विक्रेत्यांविरुद्ध १२, गॅस विक्रेत्यांविरुद्ध ३, रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांविरुद्ध १२ आणि आठवडी बाजारात भाजीपाला व फळ विक्रेत्यांविरुद्ध ७३ अशी १३३ प्रकरणे नोंदविण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये १८ लाख ९५ हजार २५० रुपये प्रशमन शुल्क वसूल करण्यात आले. सर्व कामकाजात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील निरीक्षकांचे योग्य प्रकारे सहकार्य आणि मदत केल्याचे बोकडे यांनी सांगितले.
नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कामगिरी
फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्क            ६.६१ कोटी
नोंदविलेले खटले                                    १५४६
नोंदविलेली प्रकरणे                                ४९३
दंड वसुली                                            ७० लाख

 

Web Title: Legal Metrology Department: Recovery of fine of 70 lakh in financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.