रेन वॉटर हार्वेस्टिंगवर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:54+5:302021-08-21T04:11:54+5:30
सावनेर : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार सावनेर शहरातील भालेराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्या ...

रेन वॉटर हार्वेस्टिंगवर व्याख्यान
सावनेर : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार सावनेर शहरातील भालेराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर व्याख्यान आयोजित केले हाेते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पराग निमिसे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ. राजकुमार खापेकर उपस्थित हाेते. यावेळी प्रा.डाॅ. राजकुमार खापेकर यांनी पाण्याचे महत्त्व, बचतीचे मार्ग, पावसाचे पाणी वाचविणे व साठविण्याचे स्वस्त उपाय, मोठ्या खासगी व सरकारी बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रा.डाॅ. विलास डोईफोडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. शालिनी साखरकर यांनी केले. संचालन प्रा.डॉ. प्रदीप आठवले यांनी केले तर, प्रा. चंद्रशेखर पाेटाेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.