भाडेपट्टेदाराना घेता येणार आता अभय योजनेचा लाभ ; योजनेला एक वर्ष मुदतवाढ

By आनंद डेकाटे | Updated: August 27, 2025 16:11 IST2025-08-27T16:09:53+5:302025-08-27T16:11:01+5:30

Nagpur : अभय योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Leaseholders can now take advantage of Abhay scheme; Scheme extended for one year | भाडेपट्टेदाराना घेता येणार आता अभय योजनेचा लाभ ; योजनेला एक वर्ष मुदतवाढ

Leaseholders can now take advantage of Abhay scheme; Scheme extended for one year

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विदर्भाच्या नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी दिलेल्या नझुल जमिनींसाठीच्या विशेष अभय योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.नागपूर व अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने शासनास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी करण्यात येत होती.


ज्या भाडेपट्टेदारांना या योजनेमध्ये आतापर्यंत विविध कारणांसाठी भाग घेता आला नाही, अशा सर्व भाडेपट्टेदाराना या योजनेत सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी या योजनेस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे. या विशेष अभय योजनेस १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.


ही योजना ज्या नझुल जमिनी निवासी वापरासाठी लिलावाद्वारे-प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाच लागू राहील. विशेष अभय योजना समाप्तीनंतर १ ऑगस्ट २०२६ पासून शासन निर्णय २३ डिसेंबर २०१५ व शासन निर्णय २ मार्च २०१९ च्या तरतूदी लागू राहतील.

Web Title: Leaseholders can now take advantage of Abhay scheme; Scheme extended for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर