शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडमध्ये आमदाराविरोधात पत्रकबाजी

By admin | Updated: July 11, 2014 01:15 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडमध्ये आमदार सुधीर पारवे यांच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी धीर सोडला आहे. पक्षाचा एक गट जोरात सक्रिय झाला असून गटाने आमदाराविरोधात

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडमध्ये आमदार सुधीर पारवे यांच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी धीर सोडला आहे. पक्षाचा एक गट जोरात सक्रिय झाला असून गटाने आमदाराविरोधात पत्रकबाजी सुरू केली आहे. ही पत्रके पोस्टाने पाठविली जात आहेत. उमरेडच्या राजकीय वर्तुळात या पत्रकबाजीची एकच चर्चा आहे. उमरेडचे आ. सुधीर पारवे यांच्याविरोधातील हे पत्रक आहे. यासाठी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी ‘गोडबोले आमदार हटाव कृती समिती, उमरेड’ या नावाने समिती स्थापन केली आहे. त्या समितीने पत्रक प्रकाशित केले आहेत. त्यात भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभेच्या आमदाराबाबत स्थानिक जनता, कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे यात नमूद आहे. पक्ष संघटनेत रस न घेणे, मतदारसंघाच्या विकासाकरिता कोणतेही काम खेचून न आणणे, आमदारकीचा उपयोग करून भावाला गिट्टीखदान सुरू करून देणे आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्रक विशेषत: पोस्टाने पाठविण्यात येत आहे. तेही भाजपच्याच बूथप्रमुखांच्या घरी पोहोचत आहेत. त्यामुळे निश्चितच भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे हे कृत्य असावे, हे स्पष्ट होते. आमदारावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत निष्क्रिय वर्तनामुळे मतदारसंघात कोणतेही नवीन काम येऊ शकले नाही. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वचक नाही, मतदारांची कामे होत नाही यामुळे जनता नाराज असून अशा आमदाराला जनता कंटाळली आहे. मतदारांमध्ये चिड निर्माण झाली आहे असे नमूद केले आहे. त्यातच अशा अकार्यक्षम आमदाराला पक्षाने पुन्हा तिकीट देऊ नये अन्यथा या मतदारसंघात भाजपचा पराभव होणे निश्चित आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकात नाव असलेल्यांपैकी भाजयुमोचे महामंत्री सुभाष कावटे यांना विचारणा केली असता पत्रकावर माझे नाव लिहून खोटी स्वाक्षरी केल्याचे त्यांनी सांगत या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. उमरेड भाजप कार्यालयाशी संपर्क साधला असता आमदाराचे स्वीय सहायक किशोर हजारे यांनी या पत्रकातील आरोप फेटाळून लावत कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)