बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळले; विजय वडेट्टीवारांचा हल्ला

By मंगेश व्यवहारे | Published: December 19, 2023 05:30 PM2023-12-19T17:30:10+5:302023-12-19T17:30:27+5:30

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संसदिय सल्लागार समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.

Leader of Opposition Vijay Wadettiwar has criticized that the winter session ended on the strength of majority | बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळले; विजय वडेट्टीवारांचा हल्ला

बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळले; विजय वडेट्टीवारांचा हल्ला

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असताना विदर्भाच्या मुद्यावर चर्चा व्हावी, याकरीता हे अधिवेशन तीन आठवड्यांचे करावे, अशी आग्रही भूमिका आम्ही घेतली होती. त्यासाठी सरकारकडे मागणी देखील करण्यात आली. मात्र हेकेखोर सरकारने बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेऊन नागपूर कराराला देखील पायदळी तुडविले आहे, असा हल्लाबोल करीत कॉँग्रेस आमदार  आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संसदिय सल्लागार समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. तीत हिवाळी अधिवेशन तिन आठवड्यांचे करावे, अशी आग्रही भूमिका आम्ही घेतली होती. मात्र ती फेटाळत सरकारने विदर्भाच्या तोंडाला पान पुसत बुधवारी २० डिसेंबररोजी गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिवेशनाने ना शेतकऱ्यांना काही दिले आहे ना विदर्भातील कष्टकऱ्यांना काही दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

Web Title: Leader of Opposition Vijay Wadettiwar has criticized that the winter session ended on the strength of majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.