टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद
By Admin | Updated: June 1, 2014 00:54 IST2014-06-01T00:54:27+5:302014-06-01T00:54:27+5:30
ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरी करणार्या टोळीचा म्होरक्या बेनोडा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चोरट्यांची ही टोळी देशभरात मोबाईल टॉवरवरील बॅटर्या

टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद
वरूड (अमरावती) : ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरी करणार्या टोळीचा म्होरक्या बेनोडा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. चोरट्यांची ही टोळी देशभरात मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरी करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला अकोला येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, बेनोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या बारगाव शिवारातील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरला वीजपुरवठा करणार्या २४ बॅटर्या चोरीला गेल्याची फिर्याद ६ नोव्हेंबर २0१३ रोजी बेनोडा पोलिसात दाखल झाली होती. याच टॉवरवरुन बॅटर्या चोरी जाण्याची दुसरी फिर्याद ७ जानेवारी २0१४ रोजी पोलिसांनी दाखल केली. यावरुन ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या नेतृत्वात बेनोडा पोलिसांनी गत दोन महिन्यांपासून चोरट्यांचा तपास सुरु केला.
मात्र धागेदोरे गवसत नव्हते. पंरतु या चोरी प्रकरणात वापरलेली टाटा सुमो एम.एच २२ डी- २५५५ हा क्रमांक तक्रारीत नमूद असल्याने ठाणेदार घुगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक मदत घेऊन सुरुवातीला गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेत गाडी मालकाला अमरावती येथून ताब्यात घेतले.
या घटनेबाबत सुरुवातीला उडवाउवीची उत्तरे देण्यात आली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच तब्बल आठ आरोपींना जेरबंद करण्यात आले. या आरोपींच्या ताब्यातून ११ लाख ५0 हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये भंगार दुकानदारांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले होते. चोरीचा माल भंगारविक्रेत्यांना विकला जात असल्याने भंगार विक्रेत्यांवरसुध्दा पोलिसांनी नजर ठेवून तपास सुरु केला. टोळीचा म्होरक्या अफसर मौलाना ऊर्फ सै. अफसर सै. जलील (४५ , रा. कारंजा लाड जि. वाशिम) हा फरार होता. मुख्य सूत्रधार असलेला आरोपी अफसर मौलाना याचे या प्रकरणात दिल्ली, इंदोरपर्यंत धागेदोरे होते. विदर्भात ही टोळी अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशीम जिल्ह्यात सक्रिय असून या टोळीने ११ चोर्यांची कबुली दिली होती. टोळीच्या म्होरक्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)