शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कायदा दुरुस्ती ही निवडणूक स्थगितीचे कारण ठरू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:55 IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्यघटनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक घेणे आवश्यक आहे. निवडणूक कोणत्याही कारणामुळे बेमुदत काळाकरिता पुढे ढकलली जाऊ शकत नाही. तसेच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यास प्रशासकाची नियुक्ती करायला पाहिजे असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी होणार असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या अंतरिम स्थगनादेशामुळे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत. या न्यायालयामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला आणि नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. त्यामध्ये न्यायालयाने या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यासोबत एकूण पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत.राज्य निवडणूक आयोगाचे वकील अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी गेल्या सोमवारी उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सादर केला व निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. परंतु, उच्च न्यायालयाने सध्याच्या परिस्थितीत आयोगाची विनंती मान्य करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आणि प्रकरणावरील सुनावणी २९ जुलैपर्यंत तहकूब केली.असा आहे वादकायद्याच्या कलम १२(२)(सी) मध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कायद्यात दुरुस्ती होतपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांमध्ये शिवकुमार यादव व इतरांचा समावेश आहे.असा आहे वादकायद्याच्या कलम १२(२)(सी) मध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कायद्यात दुरुस्ती होतपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांमध्ये शिवकुमार यादव व इतरांचा समावेश आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकnagpurनागपूर