शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सप्टेबरच्या अंतिम आठवड्यात नागपुरात संक्रमितांसह मृत्यूदरही घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:48 AM

Corona, Nagpur News नागपुरात १३ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले होते. या तुलनेत २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात ६ हजार ६१३ संक्रमित आढळले तर, मृत्यूसंख्या २३९ पर्यंत खालावली.

ठळक मुद्देसंक्रमित मिळाले फक्त ६,६१३आठवडाभरात २३९ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाच्या संक्रमितांची आणि मृतांची संख्या बरीच घटल्याचे दिसत आहे. १३ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले होते. तर ३५८ जणांचा मृत्यू झाला होता. या तुलनेत २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात ६ हजार ६१३ संक्रमित आढळले तर, मृत्यूसंख्या २३९ पर्यंत खालावली. यावरून संक्रमित निम्म्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे.नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्चला आढळला. मार्च महिन्यात १६ रुग्ण आढळले. तर एप्रिल महिन्यात ही संख्या १२२ वर पोहचून रुग्णांचा एकूण आकडा १३८ वर पोहचला होता. दोघांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात ४०३ रुग्ण आढळले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर रूग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढच होत गेली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने कहरच केला. ऑगस्ट महिन्यात २४ हजार १६३ नवे रुग्ण आढळले. यातील ९१९ जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर महिन्यात ४८ हजार ४५७ रुग्ण आढळले. या महिन्यात मृत्यूसंख्या १ हजार ४६५ झाली होती.सप्टेंबरमध्ये चढउतारसप्टेंबर महिन्यात ६ ते १२ या तारखेदरम्यान ११ हजार ९८९ रुग्ण आढळले, तर मृत्यूसंख्या ३४९ होती. १३ ते १९ तारखेदरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले तर ३५८ जणांचा मृत्यू झाला. २० ते २६ या तारखेदरम्यान ८ हजार ४४२ संक्रमित सापडले. या वेळी मृत्यूसंख्या ३३० होती. तर २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात संक्रमितांची संख्या ६ हजार ६१३ पर्यंत घसरली, मृत्यूसंख्याही २३९ पर्यंत आली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस