शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत तीनतेरा पदभरतीचे वाजले बारा

By admin | Updated: February 11, 2016 03:15 IST

सरकारी आस्थापनाद्वारे एखादी जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्यावेळी पदभरतीसंदर्भात जे नियम अस्तित्वात असतात त्याच आधारावर संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते.

सर्वोच्च न्यायालय मोठे की विद्यापीठ?जितेंद्र ढवळे  नागपूरसरकारी आस्थापनाद्वारे एखादी जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्यावेळी पदभरतीसंदर्भात जे नियम अस्तित्वात असतात त्याच आधारावर संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेत याचे काटेकोर पालन होते. मात्र याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे धोरण उलटे आहे. विद्यापीठाने ६६ शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली मग नियम बदलविण्यास सुरुवात केली. नियम बदलाची प्रक्रिया निरंतर असते. मात्र नियम बदल्यानंतर आधीची जाहिरात नियमानुसार नव्हती हा जर कुणाचा युक्तिवाद असेल तर चुकीचा ठरेल. त्याला काही कायद्याचा आधार आहे का? कुलवंतसिंग विरुद्ध दयाराम या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने (२०१५ (३) एससीसी १७७ ) निर्वाळा दिला आहे. यात संबंधितवेळी रिक्त असलेली पदे त्यावेळच्या प्रचलित नियमानुसार भरण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नागपूर विद्यापीठाने सेवाप्रवेश नियमासंदर्भातील निर्देश क्रमांक २८/२०१२ चा आधार घेत १७ मे आणि २९ जून २०१३ ला जाहिरात प्रकाशित केली होती. पदभरतीसंदर्भातील सुधारित निर्देश क्रमांक २८/२०१४ ला १९ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी मान्यता दिली.