शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यासोबतचा प्रवास ठरला अखेरचा

By admin | Updated: May 6, 2017 02:30 IST

रेल्वे प्रवासादरम्यान मृत झालेल्या बाळावर आज शुक्रवारी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मातेचा टाहो : रेल्वे प्रवासातच झाला मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान मृत झालेल्या बाळावर आज शुक्रवारी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या बाळाच्या मातेने एकच टाहो फोडल्यामुळे तेथे उपस्थित अनेकांच्या डोळ््यात पाणी आले. हुपरी, बिहार येथील रहिवासी सोनू पिंटू गुप्ता (२५) या आपल्या तीन मुलांसह हुपरीला जात होत्या. सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेसच्या महिला कोचमधून प्रवास करीत असताना त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळाची प्रकृती बिघडली. दरम्यान, बल्लारशाह रेल्वेस्थानकावरच त्याचा श्वास थांबला. बाळ काहीच हालचाल करीत नसल्याचे पाहून सोनूने एकच टाहो फोडला. त्या मातेची वेदना पाहून इतर प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली. नागपुरात गाडी येताच बाळाला छातीशी कवटाळून असलेली सोनू खाली उतरली. महिला पोलिसांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने बाळाला छातीशी कवटाळून घेतले होते. ती बाळाला सोडण्यास तयार नव्हती. अखेर महिला पोलिसांनी त्या मातेची समजूत काढल्यानंतर तिने बाळाला सोडले. त्यानंतर बाळाचे पार्थिव मेयो रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आले. आज गुरुवारी सोनूचे पती नागपुरात आले. बाळाचे शवविच्छेदन होऊन दुुपारी पार्थिवही मिळाले. त्यानंतर महिला पोलिस जयश्री बुरडे, पोलीस शिपाई भावे आणि हेड कॉन्स्टेबल शेख बाबर यांच्या उपस्थितीत मोक्षधाम घाटावर पार्थिव दफन करण्यात आले. यावेळी या मातेने एकच टाहो फोडल्यामुळे पोलिसांच्या डोळ््यातही पाणी आले.