शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मोठमोठे पदाधिकारी, पण सदस्य नोंदणीत पिछाडी; जयंत पाटलांनी टोचले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2022 13:38 IST

काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षातून आले आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. एवढे मोठे नागपूर शहर आहे. मोठमोठे नेते व पदाधिकारी आहेत; पण प्रत्यक्षात पक्षाची सदस्य नोंदणी २० हजारही झालेली नाही. हे चित्र चांगले नाही. त्यामुळे पुढील १० दिवस घराबाहेर पडा. लोकांना भेटा. मेळावे, शिबिर घ्या व किमान १० हजार क्रियाशील सदस्य व एक लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी करा, तरच नागपूरची दखल घेतली जाईल, असा सूचक इशाराही पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक गणेशपेठेतील कार्यालयात मंगळवारी झाली. तीत प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील हे सदस्य नोंदणीवरून चांगलेच आक्रमक झाले. आपल्याला भाषणबाजी करायची व ऐकायचीही नाही, असे बजावतच त्यांनी थेट सदस्य नोंदणीच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह प्रदेश पदाधिकारी यांनी प्रत्येकी किमान ५ हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करावी. युवक, विद्यार्थी, महिला सर्वच विभागांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. या नोंदणीचा पक्ष पातळीवर हिशेब ठेवला जाईल व पुढे जबाबदाऱ्या देतााच या नोंदणीचा विचार केला जाईल.

काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षातून आले आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. क्रियाशील सदस्यांमधूनच बूथ अध्यक्ष व बूथ प्रतिनिधी यांची निवडणूक घेतली जाईल. त्यानंतर विधानसभा पदाधिकारीसाठी निवडणूक घेतली जाईल. सप्टेंबरच्या शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला नागपूरचे निरीक्षक माजी आ. राजू जैन, माजी मंत्री रमेश बंग, सुबोध मोहिते, माजी आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे, सलील देशमुख, प्रदेश महासचिव रमन ठवकर, शेखर सावरबांधे, आभा पांडे, वेदप्रकाश आर्य, दिलीप पनकुले, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, प्रशांत पवार, जानबा मस्के, अनिल अहीरकर, वर्षा शामकुळे, शब्बीर अहमद विद्रोही, संतोष सिंग, शिव भेंडे, आदी उपस्थित होते.

मनपाचे तिकीट हवे असेल तर एक हजार सदस्य करा

 ज्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला महापालिकेचे तिकीट हवे असेल त्याने त्याच्या प्रभागात किमान एक हजार प्राथिमक सदस्यांची नोंदणी करावी, असे टार्गेट जयंत पाटील यांनी दिले. विधानसभा लढायची असेल त्यांनी किमान ५ हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करावी. निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील; पण आपण शांत बसू नका, तयारी सुरू ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलnagpurनागपूर