७२,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:52+5:302021-06-02T04:08:52+5:30
माैदा : चाेरट्याने स्टाेअर रूममध्ये प्रवेश करीत आतील ७२,५०० रुपये किमतीचे विविध साहित्य चाेरून नेले. ही घटना माैदा पाेलीस ...

७२,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
माैदा : चाेरट्याने स्टाेअर रूममध्ये प्रवेश करीत आतील ७२,५०० रुपये किमतीचे विविध साहित्य चाेरून नेले. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथे नुकतीच घडली.
शेख दानिस रियाज, रा. भिवंडी, जिल्हा ठाणे हे कंत्राटदार असून, त्यांनी धामणगाव (ता. माैदा) येथे राहण्यासाठी खाेली किरायाने घेतली आहे. त्या खाेलीच्या शेजारी त्यांची स्टाेअररूम असून, त्यात काही साहित्य ठेवले हाेते. चाेरट्याने त्या स्टाेअर रूममध्ये प्रवेश केला आणि आतील २० हजार रुपयांच्या १२ बॅटऱ्या, ४८ हजार रुपयांच्या डाेजरच्या १८ चेन, ५०० रुपयांच्या दाेन ताडपत्री, ४,००० रुपयांचा डिझेल पंप असे एकूण ७२,५०० रुपयांचे साहित्य चाेरून नेले.
ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार ठाकूर करीत आहेत.