दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:10 IST2021-03-01T04:10:21+5:302021-03-01T04:10:21+5:30

मौदा : चोरट्याने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ...

Lampas stole Rs 2 lakh | दोन लाखांचा ऐवज लंपास

दोन लाखांचा ऐवज लंपास

मौदा : चोरट्याने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मौदा शहरात गुरुवारी मध्यरात्री घडली.

राजेश भागवत जाने (४०, रा. शिवाजीनगर, मौदा) हे गुरुवारी सायंकाळी कामावर गेले होते. घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्याने समोरच्या दोन्ही दारांची कडी तोडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ते शुक्रवारी सकाळी घरी आले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.

Web Title: Lampas stole Rs 2 lakh