२९ हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:06+5:302020-12-26T04:08:06+5:30

कामठी : चाेरट्याने घरफाेडी करीत २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कामठी शहरातील कुंभारे काॅलनीत गुरुवारी ...

Lampas looted Rs 29,000 | २९ हजाराचा ऐवज लंपास

२९ हजाराचा ऐवज लंपास

कामठी : चाेरट्याने घरफाेडी करीत २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कामठी शहरातील कुंभारे काॅलनीत गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री घडली.

सिनमपाल रामा ढाेके (६२, रा. कुंभारे काॅलनी, कामठी) हे त्यांच्या कुटुंबीयांसह गुरुवारी सकाळी रनाळा (ता. कामठी) येथे त्यांच्या मुलीकडे गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून मध्यरात्री चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील साेन्या-चांदीचे दागिने व कपडे घेऊन पळ काढला. ते शुक्रवारी सकाळी घरी परतले असता, त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात आले. चाेरट्याने एकूण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Lampas looted Rs 29,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.