एसआरपीएफ जवानाच्या पत्नीचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:31+5:302021-08-17T04:14:31+5:30

एसआरपीएफचे जवान सुनील वाटकर (रा. पांडुरंगनगर, हिंगणा) यांची पत्नी माधुरी आपल्या मुलासह सीताबर्डीला येण्यासाठी शनिवारी दुपारी ऑटोत बसल्या. यावेळी ...

Lampas with jewelery of SRPF jawan's wife | एसआरपीएफ जवानाच्या पत्नीचे दागिने लंपास

एसआरपीएफ जवानाच्या पत्नीचे दागिने लंपास

एसआरपीएफचे जवान सुनील वाटकर (रा. पांडुरंगनगर, हिंगणा) यांची पत्नी माधुरी आपल्या मुलासह सीताबर्डीला येण्यासाठी शनिवारी दुपारी ऑटोत बसल्या. यावेळी त्यांच्यासोबत आणखी तीन महिला ऑटोत बसल्या. त्या महिला काही अंतरावर ऑटोतून उतरल्या. उत्तर अंबाझरी मार्गावर माधुरी यांचे आपल्या बॅगकडे लक्ष गेले असता चेन उघडी दिसली. त्यामुळे त्यांनी बॅगमधील दागिने बघितले. ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या महिलांनीच हे दागिने चोरले असावे, असा संशय आहे. माधुरी यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे पावणेदोन लाख रुपये असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. त्या चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे.

----

Web Title: Lampas with jewelery of SRPF jawan's wife