शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

लोकसभा निवडणुकीत लालपरीचा लागला लळा; भारी डिमांड, दोन दिवसांत ५४ लाखांचा गल्ला

By नरेश डोंगरे | Updated: April 27, 2024 19:11 IST

हिंग लगे ना फिटकरी, भारी डिमांड : दोन दिवसांत ५४ लाखांचा गल्ला

नागपूर: प्रवाशांच्या सेवेत अहोरात्र धावपळ करणाऱ्या लालपरीचा जागोजागच्या प्रशासकीय यंत्रणांनाही चांगलाच लळा लागला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तिला दूर-दूरून बोलवणे येत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक प्रक्रियेत मोजकी धावपळ करतानाच लालपरीला मोबदला मात्र भरभरून मिळत आहे. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील जनतेची खरी सखी-सोबती म्हणून लालपरीचे अर्थात एसटी महामंडळाच्या बसचे नाव घेतले जाते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता ती अहोरात्र प्रवाशांना सेवा देत असते. नफा नुकसानीचा कसलाही विचार मनात न आणता तिची सेवा सुरू असल्याने गावोगावचे नागरिकही तिला लळा लावताना दिसतात. 

अशात आता लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी देशभर सुरू आहे. मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात लालपरीचा हातभार लागावा म्हणून एसटी महामंडळाने जागोजागी नियोजन केले आहे. दुसरीकडे जागोजागच्या प्रशासकीय यंत्रणेनेही लालपरीला प्राधान्य देत तिची सेवा घेणे सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे थोडाफार प्रवासी सेवेवर परिणाम होत असला तरी दुसरीकडे कमी धावपळ करून लालपरीचा गल्ला मात्र चांगला भरत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातून २४४ बसेस नागपूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत पाठविण्यात आल्या होत्या. १८ आणि १९ एप्रिल अशी दोन दिवस सेवा देण्याच्या बदल्यात लालपरीला जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून ५३ लाख, ९२ हजार, ४०० रुपयांचा मोबदला मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरावती, अकोल्यात धावपहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील मतदार संघाात सेवा देणाऱ्या लालपरीला दुसऱ्या टप्प्यात सेवा देण्यासाठी अमरावती, अकोला येथून मागणी आली होती. त्यानुसार, नागपुरातून अमरावतीला ३३ आणि अकोला येथे ४० बसेस पाठविण्यात आल्या. तेथे २५ आणि २६ एप्रिलला सेवा दिल्यानंतर आज लालपरीची घरवापसी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अंतर अन् अमरावती, अकोल्याचे अंतर बघता तेथूनही १५ ते २० लाखांचा मोबदला लालपरीला मिळण्याची शक्यता अधिकारी वर्तवित आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४